महापालिकेत स्वच्छतेचा जागर

पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पालिकेतर्फे खारघर, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या चारही प्रभागात शुक्रवारी (ता.31) आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मशाल रॅलीमध्ये विविध क्षेत्रातील हजारोच्या संख्येने महिला व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. प्रत्येक प्रभागासाठी प्रेरणादायी महिला स्वच्छता कर्णधारांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत उपायुक्तांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्वांना स्वच्छता शपथ देण्यात आली.

स्वच्छोत्सव 2023 अंतर्गत पनवेलमध्ये मुख्यालयापासून वडाळा तलवापर्यंत निघालेल्या या रॅलीचा मुख्य उद्देश महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग तसेच महिलांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेमध्ये झालेले बदल साजरे करणे आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आशा सेविका, प्राथमिक आरोग्य परिचारिका, सर्व शाळा, कॉलेज, एनजीओ, महिला बचत गट यांना समाविष्ट करून स्वच्छतेच्या बाबत व्यापक जनजागृती करून रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला.

पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब मध्ये स्वच्छता उत्सव 2023 अभियान राबविण्यात आले सदर अभियानामध्ये महिला बचत गटाचे 10 स्टॉल लावण्यात आले आहे या अभियानात सुमारे एक हजार महिला उपस्थित होत्या. पनवेल महानगरपालिकाप्रभाग समिती-कामोठे-विभागात स्वच्छता उत्सवांतर्गत अभियान राबविण्यात आले. यावेळी आदिवासी विकास परिषद, दिशा महिला मंच, संस्कार महिला संस्था, सरस्वती महिला बचत गट, एमजीएम मेडिकल कालेज, रॉबिनहुड आर्मी, प्राथमिक आरोग्य केंद्र कमोठे, आशा स्वयं सेविका उपस्थित होत्या. स्वच्छतेच्या बाबत व्यापक जनजागृती करून रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. सदर अभियानामध्ये महिला बचत गटाचे 20 स्टॉल लावण्यात आले आहे या अभियानात अंदाजे आठशे महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version