15 मिनिटांत रस्त्यांना नदीचे स्वरूप; वाहने झाली आडवी
| उरण | प्रतिनिधी |
शनिवारी (दि. 7) दुपारी 1 च्या सुमारास उरण शहरात तुफान पाऊस झाला. 15 मिनिटांच्या अंतरावर कोसळलेल्या या पावसात शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले.तर, काही वाहने आडवी झाली. या पावसात चालकांची एकच तारांबळ उडाली. पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानात उडाल्याने व्यावसायिकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. ही अशीच परिस्थिती राहिली तर पावसाळ्याचे पुढचे काही महिने उरणची अवस्था कशी असणार आहे, असा सवाल सध्या संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत. तरी, उरण नगरपरिषदेने ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत.