| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तळोजा आणि कळंबोली येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघींनीही प्रवासादरम्यान हेल्मेट घातले नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
या अपघातांची पहिली घटना पनवेल शीव महामार्गावरील रोडपाली येथील पुरुषार्थ पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपूल उतरणीवर घडली. कळंबोलीत राहणारी 19 वर्षीय महिला मित्रासोबत दुचाकीवरुन जात असताना पाठीमागून ट्रकची जोरदार धडक बसल्याने ती महामार्गावर कोसळून जागीच ठार झाली. तर, दुसर्या घटनेत पनवेल-मुंब्रा महामार्गावर खारघरच्या आरएफए बटालियन कॅम्पच्या सिग्नलच्या चौकशेजारी कळंबोली येथे राहणार्या महिलेला मानपाडा येथे दुचाकीने जात असताना भरधाव ट्रकने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.