आ. जयंत पाटील यांची उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
दिवाळीसाठी राज्य शासनाकडून दिला जाणारा आनंद शिधाचे वाटप शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे महावीर महिला बचत गट, साईनगर खंडाळे रास्त भाव धान्य दुकान येथे दि. 21 ऑक्टेाबर रोजी पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आ. जयंत पाटील यांच्यासह अलिबाग तालुका पुरवठा अधिकारी नम्रता भोयर, ग्रामपंंचायत अव्वल कारकून श्रद्धा टेकाडे, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, वरसोलीचे सुरेश घरत, ग्रा.पंं. सदस्या समिक्षा पाटील, सुचिता कावजी, नरेश गोंधळी, विनोद पाटील, माजी सरंपच संतोष गुरव, नशिकेत कावजी, उदय वेळे, प्रमुख कार्यकर्ते विलास वालेकर, रामदास कावजी, रवींद्र पाटील, सोहम वैद्य यांच्यासह इतर कार्यकर्ते, महावीर महिला बचत गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य उपस्थित होते.