वन्यप्राण्यांच्या अवयवापासून बनविलेल्या वस्तू जप्त

| पनवेल | वार्ताहर |
वन्य जीवांच्या शिकारीला बंदी असताना अवैध मार्गाने शिकारीचा सिलसिला सुरु असल्याचा सर्वात मोठा पुरावा पनवेलजवळील खारघरमध्ये सापडलाय. येथील सेक्टर 21 मध्ये राहणार्‍या एका इसमाकडे हस्तीदंत व वन्य जीवांच्या अवयवांपासून बनविलेल्या वस्तूंचे घबाड सापडले. या वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोडो रुपयांची किंंमत असल्याचे बोलले जाते. वन विभागाची ही सर्वात मोठी जंबो कारवाई असल्याची चर्चा आहे.

वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युुरो नवी मुंबई व दिल्ली यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन ही सर्वात मोठी कारवाई झालेय. गुप्त बातमीवरुन वन विभागाचे एसीएफ वाघमोडे, आरएफओ सोनवणे, परिमंडळ वन अधिकारी संजय पाटील, वन कर्मचारी यांनी खारघर सेक्टर 21 मध्ये धाड घालून एका इसमाला ताब्यात घेतलेय. त्याच्याजवळच करोडो रुपयांच्या वन्य जीवांच्या अवयवांपासून बनविलेल्या वस्तू सापडल्यात.सदर इसमावर भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39, 48, 49,57, अन्वये कारवाई करण्यात आलेय. हस्तीदंत व वन्य जीवांच्या अवयवांपासून बनविलेल्या वस्तू वनविभागाने जप्त केल्या आहेत. तसेच या वस्तूंची फॉरेन्सीक टेस्ट करण्यासाठी त्या पुणे येथील लॅबमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. प्राण्यांच्या अवयवांपासून देवदेवतांच्या मूर्ती, प्राण्यांचे शिल्प, बांगड्या, दागिने, शंख, दात, वेगवेगळ्या डिझाईन्स, छोटे डमरु, शोभिवंत वस्तू बनविण्यात आल्याचे दिसून येते.

Exit mobile version