इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

। मुंबई । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही प्रमाणात घट केली असली, तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच आहेत. त्यातच घरगुती गॅसचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणार्‍या धोरणांविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विविध आंदोलनं करणार असल्याची घोषणा पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसं जनजागरण अभियानाची घोषणा केली आहे. महागाई, बेरोजगारी आणि भाजपनिर्मित बरबादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्याची घोषणा आहे. आपणही या, आमच्या जन जागरण अभियानाशी जोडले जा आणि देश वाचवा, असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version