माजी आ. पंडित पाटील यांच्याकडून राजाराम धुमाळ यांच्या कुटुंबाचे सांत्वन

। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील पष्टी येथील माजी सरपंच राजाराम धुमाळ यांच्या आईचे दसर्‍याच्या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले होते. जनिबाई सखाराम धुमाळ यांनी आठयांशी व्या वर्षी निधन झाले. धुमाळ कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अलिबाग मुरुडचे माजी आ. पंडित पाटील म्हसळा तालुक्यातील पष्टी येथील त्यांचा निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांचा सोबत म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील,श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक गिजे, आर.डी. सी. सी. बँकेचे संचालक तुकाराम महाडिक, माजी संचालक श्रीपद ढोकटे, सरपंच निलेश मांडाडकर,माजी सरपंच स्वप्नील बिराडी उपस्थित होते.

Exit mobile version