कंटेनरची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यात भरधाव कंटेनरने रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळवाडी येथे भरधाव कंटेनरने रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रिक्षाचालक आणि कंटेनरचालक यांना शोधून ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version