। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यामध्ये ठेकेदारांची सुमारे 150 कोटी रुपयांची बिले थकित आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे, तसेच गेल्या दीड ते दोन वर्षापासून जो निधी त्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे तो निधी उपलब्ध न झाल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना काम बंद आंदोलन करण्यास प्रवृत्त केले गेले. त्यामुळे बुधवार दि. 5 फेब्रुवारीपासून कर्जत तालुका ठेकेदार संघटनेने काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्या संदर्भातील निवेदने अधीक्षक अभियंता कोकण भवन, कार्यकारी अभियंता पनवेल, उपअभियंता कर्जत यांना देण्यात आले आहेत.