। अलिबाग । प्रतिनिधी ।
कोलघर येथील आदीवासी आश्रम शाळेतील 435 विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप नुकतेच करण्यात आले आहे. समरेश शेळके यांच्या पुढाकाराने अलिबागमधील डिफेन्स अॅकेडमीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.
अलिबागमधील डिफेन्स अॅकेडमीमार्फत स्वरक्षणाचे धडे देण्याचे काम केले जाते. हजारोच्या संख्येने विद्यार्थी या अॅकेडमीमध्ये शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे देत असताना सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे कामही डिफेन्स अॅकेडमीमार्फत केले जात आहे. अॅकेडमीमधील विद्यार्थ्यांमध्ये समाज सेवेची जाणीव व्हावी. मानवता धर्म मनात रुजावा हा उद्देश समोर ठेवून अॅकेडमी मार्फत सामाजिक उपक्रम घेतले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अॅकेडमीचे संस्थापक समरेश शेळके यांच्या पुढाकाराने कोलघर येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वितरीत करण्यात आले आहेत. यावेळी शाळेतील शिक्षक, डिफेन्स अॅकेडमीचे सनी शेलार, अनिकेत म्हामुणकर, प्रणय म्हात्रे, अक्षय पाटील, अमिषा भगत, सागर हिसालके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.