महिलांचे कॅन्सर मदतीसाठी योगदान

| रसायनी | वार्ताहर |

शायना एनसी आणि व्ही केअर फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्याच्या हेतूने विविध क्षेत्रातील महिलांनी रॅम्प वॉक केला. त्यांच्या खरेदीपैकी 30 टक्के कॅन्सर मदतीसाठी योगदान दिले. यावेळी डॉ. निवेदिता श्रेयांस प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, संचालिका पीआर पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि हार्टफुलनेस मध्यस्थी तज्ज्ञ मधु जैन, सिनेस्टार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान, शायना एनसी, ड्रेप क्वीन भारत आणि राजकारणी, चक दे फेम अभिनेत्री सागरिका घाटगे आणि सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी अभिनेत्री सुश्री जॅकलिन फर्नांडिस यांना ताज लँड्स एंड, ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सने हा शो आयोजित केला होता. विविध क्षेत्रातील 35 यशस्वी महिलांनी या शोमध्ये भाग घेतला होता. पद्मभूषण पुरस्कार विजेत्या वहिदा रहमान यांच्या हस्ते त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील यशाबद्दल सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.

Exit mobile version