| उरण | वार्ताहर |
जनवादी महिला संघटनेचे 12 वे रायगड जिल्हा अधिवेशन जेएनपिटी टाउनशिप येथे पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा हेमलता पाटील यांच्या हस्ते पार पडले.या आधिवेशनाला कामगार नेते भुषण पाटील ,काँम्रेड संजय ठाकुर, सिमा घरत, नागाव सरपंच रंजना पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
या अधिवेशनात संघटनेच्या मागील तीन वर्षांचा कामाचा अहवाल संघटनेच्या रायगड जिल्हा सचिव अमिता ठाकूर यांनी मांडला. त्यानंतर उपस्थीत पंधरा महिलां नी अहवालावरील चर्चेत भाग घेतला. त्यानंतर तीस महिलांची रायगड जिल्हा कमिटी निवडण्यात आली. त्यामध्ये अमिता ठाकुर यांना बढती देवून जिल्हा अध्यक्षा करण्यात आली, तर सविता पाटील यांची सेक्रेटरी म्हणून एक मताने निवड करण्यात आली.