। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा शहरात दिघी नाका ते पाभरे फाटा परिसरात फार मोठी वाहतुककोंडी होत असते. त्यामुळे सतत नकारात्मक बातम्या, परस्परांत वादावादी होत असल्याने तहसीलदार सचिन खाडे यांनी पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी व ग्रामस्थांच्या समन्वय सभेचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले आभ्यासू मत मांडले. त्यावर तहसीलदार खाडे यांनी, वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यावर वाहतुककोंडीची समस्या सुटू शकेल, त्यासाठी प्रशासन नागरिकांच्या मदतीने आवश्यक ते नियम पाळणार आसल्याचे तहसीलदार खाडे यानी सांगितले आहे.
या चर्चेला म्हसळा नगर पंचायतीचे मुख्यधिकारी विठ्ठल राठोड, स.पो. निरीक्षक संदीप कहाळे, पीएसआय सुनिल रोहीनकर, एसटी डेपो मॅनेजर मेहबूब मणेर, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिनिधी अक्षय महाजन, नगराध्यक्ष संजय कर्णिक, समीर बनकर, तुकाराम पाटील, नाजीम चौगुले, सलीम उकये, रियाज घराडे, शाहीद उकये, समीर काळोखे, शरद चव्हाण, नदीम दळवी, मुसद्दीक इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.