। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूडमधील परेश नाका ते एकदारा पुलापर्यंतचा नविन रस्त्या गेली दोन वर्षे रखडला आहे. त्याविरोधात पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी मुरुड तहसीलदार कार्यालयातील प्रांगणात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी त्यांचा दुसरा दिवस असुन मुरुड शहरासह पंचक्रोशी भागातील शेकडो नागरिकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने उपोषणकर्ते अरविंद गायकर यांची प्रकृती ढासळत असल्याने ग्रामीण रुग्णालयातील नर्स कडून त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, गायकर यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.