पनवेलमध्ये कोरोना पुन्हा वाढतोय

रुग्णसंख्येचा आकडा हजारोंच्या पार
पनवेल | वार्ताहर |
लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता येताच बाजारपेठेत होत असलेल्या गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण संख्येचा आकडा सलग पाच दिवसांपासून शंभरच्या वर जात असुन विद्यमान रुग्ण संख्येचा आकडा हजारांच्या वर पोहचला आहे.

कोरोनाची तिसरी लाट भयानक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.शासनाने जिल्हा प्रशासनाला याबाबत सुचना केलेल्या आहेत.सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात कळंबोली मध्ये 17,कामोठे 78,खारघर 247,नवीन पनवेल 478,पनवेल 64,तळोजा 135 विद्यमान रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता नागरिकांनी सतर्क होण्याची गरज आहे.

Exit mobile version