म्हसळयात कोरोनाचा शिरकाव

। म्हसळा । वार्ताहर ।
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेवर म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी यशस्वी मात केली असताना आता पुन्हा कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. म्हसळ्यात पाच नवे रुग्ण बाधीत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. पाचही बाधीत रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून आणखी दोन रुग्ण बाधित सापडले आहेत. तर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण रुग्णसंख्या नोंद 1206 इतकी आहे. यापैकी 54 रुग्ण मयत झाले आहेत.

Exit mobile version