| पनवेल | वार्ताहर |
युनायटेड कॉर्पोरेट कम्युनिटी ऑफ नेशन्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या वतीने कॉर्पोरेट क्लिनिक आणि कॉर्पोरेट टुरिझम या अभिनव संकल्पनेचा प्रारंभ करण्यात आला. बेलापूर रेल्वे स्टेशन कमर्शियल कॉम्प्लेक्स मधील आलिशान कार्यालयात शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सदर सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याला नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक मिथुन पाटील, मिंडा कॉर्पोरेशनचे रिजनल हेड कौशीक, नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 सायबर क्राईम चे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल माने, संस्थेचे सह संस्थापक तथा अध्यक्ष वैभव सोनटक्के, सह संस्थापक तथा उपाध्यक्ष डॉ.मेहुल.कुमार दवे आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दिनेश भट, डॉ विशाल ढोक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.अमेरिकेतील या क्षेत्रामधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून जगभरात ओळखल्या जाणार्या सुझन हंटर या संस्थेच्या सह संस्थापिका तथा ग्लोबल हेड आहेत.
आयोजकांच्या वतीने सिटीबेल वृत्त समूहाचे संपादक मंदार दोंदे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर एन्जॉय मार्केट सिटी मॉल चे संचालक सत्येंद्र सिंग, सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक विवेक पाटील यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.या कार्यक्रमाला डॉ. दिव्या भंडारकर, डॉ.अमित साष्टे, डॉ.पुनम साष्टे, डॉ.अजय, डॉ.नंदगोपाल आचारी आदी मान्यवर उपस्थित होते.