ढोकलेवाडी येथे क्रिकेट सामने संपन्न

| सुतारवाडी | वृत्तसंस्था |

स्वयंभू क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आनंदी माता क्रिकेट क्रीडा संघ ढोकलेवाडी येथे सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत प्रत्येक संघ अगदी चुरशीने खेळला. सदरील स्पर्धेत गावदेवी कुडली संघ अंतिम विजेता व शिवोदय जामगाव संघ उपविजेता ठरला. तर, तृतीय क्र. खैरवाडी व चतुर्थ क्र. अंबिवली संघाने मिळविला.

या सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आशिष चव्हाण, उत्कृष्ट गोलंदाज ओमकार राजिवडे, उत्कृष्ट फलंदाज जिग्नेश मुंढे तर, सामनावीर म्हणून रिषभ कोदे याने मान मिळविला. विशेष म्हणजे ढोकलेवाडी येथील आनंदी माता क्रीडा मंडळाने उत्तमरीत्या नियोजन केले होते. सामन्यांचे उद्घाटन व बक्षीस वितरण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा. दत्ताराम गोपाळ मंचेकर तसेच एक्सल इंडस्ट्रीज लि. चे मॅनेजर मा. हाशिराम मंचेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वासुदेव बंगाल, मुकुंद शिगवण, विश्वनाथ बंगाल, राजेंद्र अडलिकर, ढोकलेवाडी ग्रामस्थ तसेच आनंदी माता क्रीडा मंडळ ढोकलेवाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सामन्याचे समालोचन योगेश जाधव यांनी केले.

आनंदी माता क्रीडा मंडळ ढोकलेवाडीच्या संघाला येरळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य श्री. राजेंद्र अडलिकर यांनी टी-शर्ट तर मयुरेश शिगवण यांनी संघाला ट्रॅक पॅन्ट दिल्या. सदरील सामने अत्यंत शिस्तबद्धपणे पार पाडल्याबद्दल माजी सरपंच श्री. दत्ताराम मंचेकर यांनी सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक केले.

Exit mobile version