। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीमधील आनंदवाडी येथे श्री प्रगटेश्वर नवतरुण मित्र मंडळाचे वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्या क्रिकेट स्पर्धेचे परिसरातील 32 संघांनी सहभाग घेतला आहे. अनेक नामांकित संघांचा सहभाग असल्याने श्री प्रगटेश्वर मंडळाच्या स्पर्धेत चुरस निर्माण झाली आहे.
मोग्रज ग्रामपंचायतीमधील आनंदवाडी येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्त सदस्य अक्षय देशमुख यांचे हस्ते झाले. या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना चौधरवाडी संघ आणि भल्याचीवाडी या दोन संघांमध्ये झाला. त्यावेळी भगवान भगत, पुष्पा भगत, प्रकाश बांगारी, पांडुरंग पुंजारा, पुंडलिक उघडे, सुरेश शिंगावर, अशोक भगत, संतोष शीद, राजेंद्र उघडे, सचिन पुंजारा, सोमनाथ शिंगवा, सुनील जुगरे, जयवंत वरगडा,निलेश शिंगवा,दत्त थोराड, पप्पू सांबरी, शरद शीद, राहुल पुंजारा, नितीन उघडे, मोहन पुंजारा, प्रदीप दरवडा, रोहिदास शिंगवा, हनुमंत शिंगवा, रोहन पुंजारा, साईनाथ शीद, गणेश शीद, रमेश पुंजारा, गौरव भला, कृष्णा झुगरे, दशरथ दरवडा आदी उपस्थित होते.
तीन दिवस चालणार्या स्पर्धेसाठी मेचकरवाडी, तळपेवाडी, मालेगांव, कोठिंबे, खंदान, जांभूळवाडी, चौधरवाडी, भल्याची वाडी आदी आदिवासी खेळाडूंचे संघ सहभागी झाले आहेत.