| नेरळ | प्रतिनिधी |
थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान येथे तेथील पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी विकेंडला करीत आहेत. पाऊस सुरु झाल्यानंतर लागोपाठ तिसर्या विकेंडलादेखील माथेरान पर्यटकांनी फुलून गेले आहे. त्यामुळे माथेरानसाठी मागील वर्षे नवीन पर्यटन हंगाम समजला जात पावसाळा हंगाम भलताच फायद्याचा ठरत आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर माथेरानमधील शनिवार-रविवार पर्यटकांनी फुलून गेले आहेत. लागोपाठ तिसरा विकेंडला पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. शुक्रवारपासून माथेरानमध्ये पर्यटक येऊ लागतात आणि शनिवार कळस चढत असतो. या आठवड्यातदेखील अशीच स्थिती माथेरानमध्ये दिसून येत आहे. शनिवारी माथेरानमध्ये दुपारपर्यंत 500 हून अधिक खासगी गाड्या माथेरानमध्ये पोहचल्या आहेत. त्यामुळे दस्तुरी येथील प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी पर्यटक प्रवासी कराची पावती फेडण्यासाठी गर्दी करून होते. त्या ठिकाणी प्रवासी कर भरून शहरात प्रवेश करण्यासाठी लागलेली पर्यटकांची रांग तब्बल 200 मीटर अंतरावर पोहोचली होती.
अमन लॉज स्थानकात माथेरानला जाणारी शटल मिनी ट्रेनची तिकिटे काढण्यासाठी गर्दी करून थांबले आहेत. तर पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक हे पायी चालत शहरात पोहचत आहेत. त्यात लुईजा पॉईंट, एको पॉईंट, एडवर्ड पॉईंट, लॉर्ड्स पॉईंट, अलेझांडर पॉईंट आदी ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे तेथील व्यापार उदीम देखील वाढला आहे. तर घोड्यांनादेखील अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी भिजण्यासाठी आलेले पर्यटक हे माथेरानमधील शार्लोट लेख परिसरात निर्माण झालेल्या धबधबा येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. लागोपाठ तिसर्या विकेंडला माथेरान पर्यटकांनी फुलून गेल्याने पर्यटकांनी येथील रस्ते आणि पेक्षणीय पॉईंट फुलून गेल्याचे दिसून येत आहे.