| पुणे | प्रतिनिधी |
फोर्ब्स मार्शल समूहाचे संस्थापक दरायस एम. फोर्ब्स यांचे शुक्रवारी (दि. 11) निधन झाले. मृत्यूसमयी ते 97 वर्षांचे होते. सेंटर फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ फिलॉन्थॉफ्री (सीएपी) या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.
फोर्ब्स यांचा जन्म 1926 मध्ये झाला. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी जे.एन.मार्शल या कंपनीत काम सुरू केले. तिथून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करीत ब्रिटीश कंपन्यांशी भागीदारी केली. त्यांनी नंतर पुण्यात स्वत:चा कारखाना सुरू केला. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार उत्तरोत्तर वाढत गेला. फोर्ब्स यांच्या मागे फरहाद आणि नौशाद ही दोन मुले आहेत.