इफ्तार पार्टीतून सामाजिक एकोप्याचे दर्शन

अ‍ॅड.आस्वाद पाटील यांचे प्रतिपादन
| पोलादपूर | प्रतिनिधी |

देशामध्ये चाललेले राजकारण धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे असताना गेल्या अनेक पिढयांपासून पोलादपूर तालुक्यातील सप्तक्रोशी विभागातील लोक धार्मिक व सामाजिक भेदभावाविना एकत्र येतात. कोणतीही निवडणूक होऊ घातली नसतानाही हिंदू, मुस्लीम बौध्द समाजबांधवांचा समावेश असलेली इफ्तारपार्टी असल्याचे कळल्याने प्राधान्यक्रमाने उपस्थित राहून सर्वांना पवित्र रमजान महिन्यासह श्रीरामनवमीच्या अन् येऊ घातलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्याही शुभेच्छा देत आहे, असे उदगार माजी जि.प.अध्यक्ष अ‍ॅड आस्वाद यांनी काढले.

सवाद ते काळवली सप्तक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते समीर चिपळूणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या इफ्तारपार्टीवेळी आस्वाद पाटील यांच्यासमवेत राजिमस बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, वैभव चांदे, चंद्रकांत सणस, योगेश महाडिक, समिर चिपळूणकर, हर्षल सातपुते, यासिन करबेलकर, नासिर नाडकर, धारवली सरपंच सौ. अश्‍विनी सातपुते, काळवली सरपंच शांताराम महाडिक, इक्बाल करबेलकर, महंमद खलफे, अमजद करबेलकर, सोहेल करबेलकर, गफार नाडकर, अब्दुल हक खलफे,पत्रकार शैलेश पालकर,अमिर तारलेकर व संदिप जाबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी स्थानिक कार्यकर्ते संजय महाडीक यांनी काळवलीतील चौकामध्ये विविध राजकीय पक्षाच्या सभा झाल्या मात्र हा चौक कायम उजाडच राहिल्याने याठिकाणी सर्वांसाठी एक सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यात यावी, असे आवाहन .आस्वाद पाटील यांना केले. यापाश्‍वर्र्भूमीवर ऍड. आस्वाद पाटील यांनी पोलादपूर तालुक्यातील विविध विकास कामे करताना राजकारण म्हणून ठेवलेला दृष्टीकोन याठिकाणी मात्र ठेवणार नसून सर्वधर्मियांना याठिकाणी व्यायाम करता यावा, यासाठी व्यायामाचे साहित्य ताबडतोब उपलब्ध करून देत असून नजिकच्या काळात व्यायामशाळेची सुसज्ज इमारतही बांधण्यात येईल, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश महाडीक यांनी केले.

Exit mobile version