। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवे येथे आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल नामाची शाळा भरवण्यात आली होती. यावेळी विविध वेशभूषात संतांचे दर्शन झाले. बुधवारी (दि.17) आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. परंतु, याच आषाढी एकादशी निमित्त गोवे शाळेत मुलांच्या रूपात विठ्ठल दर्शन झाले. जणू पंढरीच येथे अवतरली असल्याचे दिसून आले. यावेळी शाळेतील छोट्या मुलांनी विठ्ठल-रुख्मिणी तसेच संत तुकाराम, संत जनाबाई, संत सखुबाई, संत मीराबाई, संत मुक्ताबाई, संत पुंडलिक अशा संताच्या वेशभूषा केल्या होत्या.