| रसायनी | वार्ताहर |
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ नवी दिल्लीच्या कोकण प्रदेश संपर्क प्रमुखपदी रामचंद्र नाना पुकळे यांची नुकतीच निवड करण्यात आली, तर प्रसिद्धी प्रमुखपदी खालापूर येथील युवा पत्रकार दत्ताभाऊ शेडगे यांची निवड नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र ऑल इंडिया धनगर समाज महासंघांचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांची निवड होताच ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश उघडे, प्रभारी अध्यक्ष आनंदराव कचरे, उपाध्यक्ष सुनील कोकळे यांनी भेटून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.