| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यामधील नांदगाव समुद्र किनारी ग्रीन टर्टल जातीचे कासव मृत अवस्थेत सापडले आहे. सुमारे सव्वा तीन फूट लांब व 45 किलो वजनाचे भव्य कासव मृत अवस्थेत सापडल्याने वन्यजीव प्रेमी यांनी हळ हळ व्यक्त केली आहे.
नांदगाव समुद्र किनारी एक मृत कासव वाहून असल्याची वार्ता वन्यजीव प्रेमी संदीप घरत यांना माहिती पडताच त्यांनी तातडीने समुद्र किनारा गाठला. याबाबतची रीतसर माहिती वन विभागाला देण्यात आली. कासवाच्या अंत्य विधीसाठी काही माणसांची गरज लागणार होती. यासाठी घरत यांनी नांदगाव ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी प्रमोद म्हात्रे यांच्याशी संपर्क करून अंत्यविधीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांची मदत मागितली. यावेळी ग्रामपंचायतचे मुकेश मिटकर यांनी सहकार्य केले.