। अलिबाग । वार्ताहर ।
महाड येथे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा स्वतःच्याच हयगमीमुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महाड-एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत आरोपी हा त्याच्या ताब्यातील हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र.एम.एच.06बी.एक्स.0920) वाहतूक नियमांचे उल्लघंन करत, भरधाव वेगात मुंबई-गोवा महामार्गावर चालवित होता. यावेळी ईसाने कांबळे गावाच्या हद्दीत त्याने मुंबईकडून येणार्या इनोव्हा वाहनाला धडक देत अपघात केला. या अपघातात इनोव्हा चारचाकी वाहनाचे नुकसान झाले असून, दुचाकीस्वार निधन पावला आहे. या प्रकरणातील पुढील कारवाई महाड-एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात येत आहे.