भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट

रुग्णसंख्येत भारत 11व्या स्थानी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. जगातील सक्रिय रुग्णसंख्येच्या यादीत भारत आता 11 व्या स्थानी आला आहे. देशात सध्या दररोज 40 हजारांच्या आसपास बाधितांची नोंद केली जात आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 40 हजार 120 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत एकूण तीन कोटी 21 लाख 17 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 30 हजार 254 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 2 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाबाधितांचा सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 85 हजार रुग्ण अजूनही कोरोनावर उपचार घेत आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version