। पाताळगंगा । वार्ताहर ।
उन्हाची दाहकता निर्माण झाल्यामुळे वातावरणात उष्णता जाणवू लागल्याने अंगाची लाहीलाही होऊ होत आहे. यामुळे प्रत्येक जण थंडाव्याच्या शोधण्यासाठी झाडाचा किंवा थंडगार ज्यूसचा आधार घेत असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
यामुळेच बर्फाच्या मागणीत विक्रमी वाढ झाली असून, यामुळे अनेकांना या हंगामी रोजगाराच्या संधीसुद्धा मिळत आहे. रणरणत्या उन्हामुळे प्रत्येक नागरिक गर्मीने त्रस्त असून, दुपारच्या वेळी थंडपेयाकडे आकर्षित होत आहेत. उष्णतेचा वाढता प्रभाव यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असताना, साहजिकच नागरिक थंड पेयाकडे आकर्षित होत आहेत.
थंडपेयासाठी बर्फाची गरज भासत असून, यामुळेच बर्फाच्या मागणीत वाढ झाली आहे. शहरातून जवळपास अंतरापर्यंत बर्फ पुरवठा केला जात आहे. यामुळे साहजिकच वाहतूक, विक्री आणि तयार होणार्या वस्तूपासून हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बर्फाला मागणी असल्याने आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. बर्फाची मागणी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने हॉटेल, समारंभ, रसवंतीगृह, ज्युससेंटर, छोटे-मोठे कार्यक्रम आदी ठिकाणी होत आहे.