मुरुड तहसीलदारांना निवेदन
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील उसरोली-आदाड, सुपेगांव, रोहा मुख्य रस्त्यावरील आदाड गावाच्या प्रवेशद्वारावर गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली काँक्रीट मोरी पूर्ववत खुली करून पाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावी, अन्यथा 20 फेब्रुवारीला रास्तारोको आंदोलनाचा इशारा उसरोली आगरी समाजातर्फे देण्यात आला आहे. याबाबत समाज अध्यक्ष गोविंद भोईर यांनी मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी सचिव अविनाश शिंदे, सहसचिव तुषार रोटकर, गांवपाटील तुकाराम नवधरकर, पंच विनोद नवघरकर, शैलेश गुंड, दिलिप गुंड, ग्रामस्थ उपस्थित होते. सदर रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग रोहा (एच.ए.एम.) यांच्या अखत्यारीत येत असून संबंधित अधिकारी यांना पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी पत्र देण्यात येत असल्याचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी यावेळी सांगितले.







