गाडी सुरू करण्याची मागणी

| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ माथेरान नेरळ मार्गावर मिनी ट्रेनची मालवाहू सेवा 1995 पासून अनिश्‍चित काळासाठी बंद केली आहे ती आजही बंद आहे. मालवाहू गाडीमधून माथेरानकर आपल्या दैनंदिन वापराचे साहित्य अगदी अल्प दरात माथेरान शहरात मुख्य बाजारपेठ पर्यंत नेऊ शकत होते. दरम्यान ही मालवाहू गाडी सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केली आहे.

माथेरानमध्ये जाण्यासाठी मिनी ट्रेन शिवाय अन्य कोणतीही वाहतूक व्यवस्था नव्हती, त्यावेळी माथेरानमधील जनता नेरळ माथेरान नेरळ या गाडीमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंचीने आण करायचे. त्यात दररोज एक मालवाहू गाडी नेरळ येथून माथेरानसाठी सोडली जायची. त्या मालवाहू गाडील प्रवाशी डब्बा मालवाहू डब्बे अशी मिक्स गाडी असायची आणि तिला मालवाहू गाडी असे नाव होते. ही मालवाहू गाडी माथेरानच्या जनतेची आर्थिक कोंडीमधून सुटका करणारी प्रमुख गाडी समजले जायची. मात्र 1995 मध्ये ही गाडी काही तांत्रिक कामासाठी बंद ठेवली गेली ती अजातागत बंद आहे.

त्या गाडीमुळे नेरळ माथेरान मार्गावरील स्थानिकांची मालवाहतूक वेळेवर नाही, त्याचवेळी खासगी वाहनांतून मालाची वाहतूक करावी लागत असल्याने स्थानिकांची आर्थिक कोंडी देखील होत आहे. त्यामुळे माथेरानसाठी महत्वाची असलेली नेरळ माथेरान नेरळ अशी चालविली जाणारी मालवाहू मिनीट्रेन चालविण्याची मागणी आहे.

Exit mobile version