पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेविका डॉ. सुरेखा विलास मोहोकर यांनी पनवेल आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संपूर्ण राज्यातील नागरिकांची लवकरात लवकर लसीकरण होण्याकरिता शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पनवेल शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्याकरिता प्रभाग क्रमांक 18 मध्ये लसीकरण केंद्र नव्याने चालू करण्याची मागणी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर यांनी केली आहे. लसीकरण केंद्र सिद्धी क्लीनिक येथे लवकरात लवकर लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी डॉ. मोहोकर यांनी केली आहे.