धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सामाजिक संस्थेच्या नोंदणीसाठी कागदपत्रे तयार करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला असून, त्याच्याविरोधात लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मादाय आयुक्त कार्यालयात एका सामाजिक संस्थेच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. मात्र, 21 ते 30 ऑगस्ट या कालावधीत या कार्यालयातील कर्मचाऱ्याने कागदपत्रे तयार करून देण्यासाठी, पंच साक्षीदार यांच्या समक्ष फोन कॉलद्वारे दहा हजार रुपयांची लाच मागितली. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल झाल्यावर पडताळणी करण्यात आली. लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी लाच मागितल्याप्रकरणी मंगळवारी (दि.8) दुपारी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
