। उरण । वार्ताहर ।
सेनेच्या प्रयत्नानंतर ऐतिहासिक चिरनेर परिसराच्या विकासासाठी महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून माजी राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी 5 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणार्या चिरनेर परिसराचा विकास सुपरफास्ट होण्यास मदत होणार आहे.
ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रह स्वातंत्र्य संग्रामातील एक सुवर्ण पान आहे. येथील पेशवेकालीन महागणपती मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या महागणपतीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक दूरवरून येतात. तर डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले अक्कादेवी डोंगर व धरण परिसरातील वर्षा सहलीसाठी उपयुक्त ठिकाण म्हणून उदयास येत आहे. अशा या चिरनेर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, यासाठी 5 कोटी 75 लाख निधीची मागणी जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांनी राज्याचे माजी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. सेनेच्या मागणीनंतर ऐतिहासिक चिरनेर परिसराच्या विकासासाठी दिली. महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी 50 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यापैकी 1 कोटी 10 लाखांचा निधी या विविध कामांसाठी याआधीच वितरित करण्यात आला तर उर्वरित उर्वरित 4 कोटी 65 लाखांचा निधीही वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.