| रसायनी | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणिस मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रसायनीतील देवळोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवेंद्र पाटील यांची पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. देवेंद्र पाटील हे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची फेरनिवड करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्याहस्ते निवडपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, राज्य चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुल म्हात्रे, पनवेल कृउबा समितीचे सभापती नारायण घरत, महाराष्ट्र मिडीया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्ता चित्रलेखा पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.