| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील चिल्हे येथील रोहा तालुका कुणबी समाजाचे उपाध्यक्ष तथा ओबीसी नेते खांब विभागीय शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मारुती खांडेकर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शेकापचे माजी आ. धैर्यशील पाटील, पंडित पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी चिल्हे येथे खांडेकर कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवराम शिंदे, कुणबी समाज उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष शंकरराव म्हसकर, ज्येष्ठ नेते महादेव मोहिते, शिवराम महाबळे, व्ही.टी. देशमुख, सुहास खरीवले, भातसई सरपंच गणेश खरीवले, अनंत वाघ, श्री. शिंदे, वसंतराव मरवडे, राम मरवडे, तानाजी जाधव, तानाजी मोरे, विजय पवार, मारुती चितलकर, शंकर मोदी, बाळा भोईर, रमेश खैरे, दिनेश शेलार, श्री. माली, श्री. जंगम, डॉ. म्हात्रे, कृष्णकांत धनवी, मोदी, गजानन बामणे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक तथा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कै. सहादेव खांडेकर यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा खांडेकर परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवारी 24 व उत्तरकार्य शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी चिल्हे येथे संपन्न होत आहेत.