बेभरवशाच्या टी-20 क्रिकेटचे विश्वविजेतेपद इंग्लंडने मिळविले. आयर्लंडकडून हरलेल्या इंग्लंडच्या डोक्यावर 2019 च्या विश्वविजेतेपदा बरोबरच टी-20 क्रिकेटच्या विजेतेपदाचा मुकूट आज ठेवण्यात आला. अंतिम फेरीत प्रवेश करणार्या पाकिस्तानलाही झिम्बाब्वेने हरविले होते. यंदाच्या विश्वचषकात असे धक्कादायक निकालांचे सत्र कायम होते. मुळातच क्रिकेटचा हा ‘मिनिएचर’ प्रकार क्रिकेटच्या गुणवत्तेला खरोखरच न्याय देतो का; हा विचार व्हायला हवा. करमणूक म्हणाल तर अंतिम सामन्यात किती करमणूक झाली याबाबतही मतभिन्नता आहे.
या क्रिकेटच्या वेळी स्टेडिमबाहेर लागलेली जत्रा पाहिली की आपण क्रिकेटसाठी आलोय का या जत्रेमध्ये सहभागी व्हायला आलोय हा प्रश्न पडतो. विविध कंपन्यांचे जाहिरातींचे स्टॉल्स, नव्हे मोठमोठे तंबू, स्टेज आणि कानठळ्या बसविणारे संगीत. वाटेत सर्कशीतले विदूषक अनेक दिसतात. बाजूलाच, कुणीतरी सेलिब्रेटी नाहीतर क्रिकेटपटू याच्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी लाईन लागलेली दिसते. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर बोलूच नका. जगातील सर्वच देशांचे, प्रांतांचे खाद्यपदार्थ विक्रीला ठेवलेले आढळतात. अधिकृत उत्पादनाच्या नावाने चाललेली प्रचंड लूट पाहिली की वाटतं क्रिकेटसाठी हे चाललंय का याच्यासाठी क्रिकेट!
आयसीसीच्या सदस्य देशांच्या यादीने संस्थेचे शतक कधीच ओलांडले आहे. कसोटी खेळणारे आठ प्रमुख देश सोडले तर अन्य 90 ते 95 देशामध्ये क्रिकेट यथातथाच आहे. आयसीसीचे लक्ष किंवा डोळा आहे; प्रचंड लोकसंख्या असणार्या देशांवर. कारण एकदा का प्रेक्षकांची झुंबड सामने पाहण्यासाठी उडाली तरी मार्केटिंगची जाळी फेकायची. त्यामुळेच आयसीसीने या नव्वदपेक्षा अधिक देशांना ट्वेंटी-20 चा लिग आयोजित करण्याचे खुले परमिट दिले आहे. म्हणजे उद्या अर्जेंटिना, ब्राझिल, चीन आदी देशांमध्ये अशा लिज आणि पुढे मागे आयसीसीचा विश्वचषक आयोजित केला गेल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.
हे जाहिरातीचे, करमणूकीचे युग आहे, हे जरी मान्य केले तरीही जबरदस्तीने … गाडून बॅट-बॉल हाती देऊन खेळाचा प्रसार करण्याचा विचार योग्य नाही. एकीकडे ऑलिम्पिक संघटना देखील खेळांचा उच्च दर्जा टिकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते आहे. ऑलिम्पिक आयोजनासाठी पुरस्कर्ते जाहिरातदार यांचीही मदत घेतली जाते. तरीही हौशीपणा आणि बाजारु मार्केटिंग यासाठी आखून दिलेली जात परिसिमा ओलांडली नाही. कारण खेळासाठी स्पर्धा आयोजित केली जाते. मानवाच्या क्रीडाक्षमतेच्या उंचीचे मोजमाप, मुल्यमापन योग्य रितीने व्हावे यासाठी आखून दिलेली चौकट मोडली जात नाही. पैसे कमाविण्यासाठी फन झोन, फन पार्क किंवा जत्रा भरविल्या जात नाहीत. तेथील विक्रम, आकडेवारी, उच्चांक यांना त्यामुळेच अधिक महत्व येते.
स्टेडियममध्ये क्रिकेट पहायला येणारे प्रेक्षक चेहर्यावर आप्लया देशाचा ध्वज रंगवून येतात, हातात राष्ट्रध्वज घेऊन येतात. जेव्हा यापैकी अनेकांना आपल्या देशाच्या संघांचा कप्तान, कोण आहे, अन्य खेळाडूंची नावे सांगता येत नाही, तिथे क्रिकेट पराभूत होते. परदेशात लोकांसाठी आपल्या देशवासियांना एकत्र येण्यासाठी असे ‘फ्लॅटफॉर्म’ हवे असतात. मग ते व्यासपीठ अशा 10 षटकांच्या, 100 चेंडूच्या किंवा 20 षटकांच्या क्रिकेटचे असले तरीही त्यांना फरक पडत नाही. बाहेर दिवसभर करमणूकीचे कार्यक्रम बघायचे आणि वेळ मिळाला की स्टेडियममधील क्रिकेट, असे करणारे कित्येकजण यावेळी मला ऑस्ट्रेलियन भेटले. एवढेच कशाला या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने लागलेले खाद्यपदार्थ स्टॉल्स, विविध स्पर्धा, ‘म्युझिकल’ कार्यक्रम हेच बाहेर बसून पाहण्यात धन्यता मानणार्यांची संख्या मोठी होती. कारण खेळासाठी स्पर्धा आयोजित केली जाते. मानवाच्या क्रीडाक्षमतेच्या उंचीचे मोजमाप, मूल्यमापन योग्य रितीने व्हावे यासाठी आखून दिलेली चौकट मोडली जात नाही. पैसे कमविण्यासाठी फन झोन, फन पार्क किंवा जत्रा भरविल्या जात नाहीत. तेथील विक्रम, आकडेवारी, उच्चांक यांना त्यामुळेच अधिक महत्व येते.
स्टेडियममध्ये क्रिकेट पहायला येणारे प्रेक्षक चेहर्यावर आपल्या देशाचा ध्वज रंगवून येतात, हातात राष्ट्रध्वज घेऊन येतात. जेव्हा यापैकी अनेकांना आपल्या देशाच्या संघांचा कप्तान कोण आहे, अन्य खेळाडूंची नावे सांगता येत नाही, तेथे क्रिकेट पराभूत होते. परदेशात लोकांसाठी आपल्या देशवासियांना एकत्र येण्यासाठी असे ‘फ्लॅटफॉर्म’ हवे असतात. मग ते व्यासपीठ अशा 10 षटकांच्या, 100 चेंडूच्या किंवा 20 षटकांच्या क्रिकेटचे असले तरीही त्यांना फरक पडत नाही. बाहेर दिवसभर करमणूकीचे कार्यक्रम बघायचे आणि वेळ मिळाला की स्टेडियममधील क्रिकेट; असे करणारे कित्येकजण यावेळी मात्र ऑस्ट्रेलियन भेटले. एवढेच कशाला या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने लागलेले खाद्यपदार्थ स्टॉल्स, विविध स्पर्धा, ‘म्युझिकल’ कार्यक्रम हेच बाहेर बसून पाहण्यात धन्यता मानणार्यांची संख्या मोठी होती.
कारण आत, स्टेडियममध्ये चालले आहे, त्या तिकिटांचे काळ्या बाजारात भरमसाठ पैसे आकारले जातात. त्याच पैशाने स्टेडियमबाहेर आपले मनोरंजन अधिक स्वस्तात आणि चांगल्या प्रकारे करुन घेता येते, असे मानणारा मोठा वर्ग येथे आहे. त्यामुळेच भारत, पाकिस्तानचे क्रिकेट सामने वगळता अन्य सामन्यांना फारशी गर्दी नव्हती. अगदी यजमान ऑस्ट्रेलियाचे सामने असतानाही स्टेडियम्स ओस होती आणि बाहेर मात्र गर्दी होती.
खेळाचे मार्केटिंग करण्याच्या नादात आपण कुठे चाललो आहोत? भारतात स्टेडियमच्या आजूबाजूला मोठमोठाले पार्कस किंवा गार्डन्स नाहीत. मोकळ्या जागा नाहीत. त्यामुळे क्रिकेटचा हात धरुन घुसू पाहणारा भस्मासूर मोठा झाला नाही. आयपीएलच्या निमित्ताने त्या भस्मासूराला मोठा करण्याचे निरनिराळे सोपस्कार, प्रयोग प्रतिवर्षी केले जाताहेत. मात्र वेळीच क्रिकेट आणि एंटरटेनमेंट यातील तारतम्य बाळगले नाही तर मॅचफिक्सिंगमुळे जसे क्रिकेट बदनाम झाले होते, तसे आज ना उद्या या मार्केटिंग, फॅन पार्कच्या बाजारु वृत्तीमुळे क्रिकेटचा खेळ बदनाम व्हायला वेळ लागणार नाही.