| रसायनी | वार्ताहर |
उद्योजक संजय पोतदार यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात डायलिसिस सेंटर 26 जानेवारी पासून चालू केले आहे. यावेळी लायन्स इंटरनेशनलचे प्रांतपाल लायन परमेश्वरन व लायन डॉ. संजय पोतदार यांनी डायलिसिस सेंटरचे उद्घाटन केले.
लायन्स क्लब पनवेलचे अध्यक्ष लायन सिताराम चव्हाण, सचिव लायन अशोक गिलडा, खजिनदार लायन मनोज म्हात्रे व आमंत्रित लायन्स इंटरनेशनलचे प्रांतपाल व माजी प्रांतपाल व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रभाकर पटवर्धन रूग्णालयाच्या अध्यक्षा डॉ. किर्ती समुद्र यांनी संस्थेच्यावतीने रूपये 28 लाखांचा चेक स्वीकारला. सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ जनकल्याण समितीचे मान्यवर उपस्थित होते. लायन डॉ. संजय पोतदार यांनी सांगितले की, यांसारख्या उपक्रमांना यापुढेही काही मदत लागली तर आम्ही देऊ व पटवर्धन स्मृती रुग्णालयाबरोबर सहाय्य चालू ठेवू.