| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील कोलाड येथील अल्पावधीत नावारूपाला आलेल्या शरंण्या अकॅडमीमधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभा प्रसंगी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बुधवारी, (दि.29) रोजी बोर्ड परीक्षेविषयी मौलिक मार्गदर्शन आणि शुभेच्छा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
शरंण्या अकॅडमीच्या संचालिका ऋतूजा महागावकर, संचालक तेजस महागावकर यांच्या परिश्रम व सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कोलाड नाक्यावर अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि विद्यार्थ्यी वर्गाच्या पसंतीस उतरलेल्या शरंण्या अकॅडमीच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या दहावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे शुभेच्छा सन्मान सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आदर्श शिक्षक तथा पत्रकार नंदकुमार मरवडे, केशव म्हस्के, कल्पेश पवार, तुषार जंगम, विलास निकम, लाला शिंदे, कोलाड सरपंच रविंद्र सागवेकर, यशवंत निकम, शकुंतला निकम आदी मान्यवरांसह शरंण्या अकॅडमीचे विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.