डिझेल तस्करांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

जेएनपीटी महामार्गावरील उड्डाणपुलावर एका सिमेंट मिक्सरच्या टाकीतून डिझेल चोरणाऱ्या चोरांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी वाहतूक पोलिसांना जोरदार धक्का दिला आणि त्यांच्या गाडीतून पळून गेले. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

जेएनपीटी महामार्गावरील उड्डाणपुलावर पुष्पकनगरसमोरील एका सिमेंट मिक्सरच्या टाकीतून दोघे जण डिझेल चोरून नेण्याच्या प्रयत्नात असतानाच, अचानक पनवेल वाहतूक शाखेचे रात्रीची गस्त घालणारे पोलिस हवालदार अमीर रसूल मुलाणी आणि त्यांचे सहकारी युवराज येळे तिकडे रस्त्यावर थांबलेली वाहने काढत होते. त्यांनी डिझेल चोरांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना, त्या दोघा चोरांनी येळे यांना जोरदार धक्काबुक्की करत खाली पाडले. याशिवाय त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पळून गेले. येळे यांच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत मुलाणी यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात हस्तक्षेप आणि महामार्गावर डिझेल चोरी केल्याचा गंभीर गुन्हा नोंदविला आहे. 

Exit mobile version