। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल परिसरातील महामार्गांवर उभ्या केलेल्या ट्रेलरमधून तब्बल अडीचशे लिटर डिझेलची चोरी झाली. ही घटना कळंबोली सर्कल ते जेएनपीटी महामार्गावर घडली. पनवेल जेएनपीटी महामार्ग तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत अनेक ट्रेलर आणि ट्रक चालक रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी आपली वाहने उभी करतात. मात्र, वारंवार महामार्गावर डिझेल चोरीचे प्रकार घडू लागल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणी 29 वर्षीय ट्रेलर चालक राजकुमार यादव यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, यादव यांनी कळंबोली सर्कलवरून जेएनपीटीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर त्यांचा ट्रेलर विश्रांतीसाठी उभा केला होता. पहाटे सुमारे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी ट्रेलरच्या टाकीचे डिझेल कुलूप तोडून त्यामधील अंदाजे 250 लिटर डिझेलची चोरी केली. या प्रकरणी 22,500 रुपयांचे डिझेल चोरीला गेल्याची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली.
उभ्या केलेल्या ट्रेलरमधून डिझेलची चोरी
