। उरण । वार्ताहर ।
आषाढी एकादशीनिमित्त उरण शहरासह ग्रामीण भागात ठीक-ठिकाणी दिंडी व पालखी काढण्यात आली होती. यावेळी विठ्ठल नाम घोषाने उरण शहर दुमदुमले होते. यावेळी महिलांनी आपल्या डोक्यावर तुलसी घेऊन विठ्ठल नामस्मरण करीत होत्या. तर, पुरुष वारकरी मंडळी विठ्ठल नामाचा जयघोष करीत होते. उरण तालुक्यात भेंडखल, चिरनेर, उरण शहरातील देऊळ वाडी, मोरा, बोरी नाका आदी ठिकाणाहून विठ्ठल रखुमाई मंदिरातून दिंडी-पालखी काढण्यात आल्या होत्या.