महामार्गावर दिशादर्शक फलक गायब

बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील कोलाड, पुई, खांब, सुकेळी,वाकण, नागोठणे या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालक रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जात आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे, याकडे सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. सुकेळी येथील जिंदाल गेट समोर आशिर्वाद हॉटेलसमोर दिशादर्शक फलक नसल्यमुळे टुव्हीलरस्वार हा रस्त्याच्या विरुद्ध गेला व सुदैवाने मालवाहू ट्रक खाली जाता जाता थोडक्यात बचावला.

या बायपास रस्त्यावर आजूबाजूला विविध प्रकारच्या व्यवसायिकांच्या टपर्‍या असून रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा चुकविण्याच्या नादात वाहन टपरीमध्ये घुसून मोठा अपघातही होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे अनेक वेळा वाहन चालक विरुद्ध दिशेला जात असून यामुळे दिवसेंदिवस अपघात होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न प्रवाशी वर्गातून केला जात आहे.

Exit mobile version