विद्या विकास शाळेत पौष्टिक अन्न पदार्थ प्रदर्शन

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत महिला मंडळ संस्थेच्या विद्या विकास शाळेत विद्यार्थ्यासाठी पोषण माह सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाचा समारोप पौष्टीक अन्न पदार्थ प्रदर्शनाने झाला असून विद्यार्थ्यांनी कडधान्य तसेच कंदमुळे आणि हिरव्या पालेभाज्या यांच्या पासून बनविलेल्या पदार्थांचे प्रदर्शन मांडले होते. या सप्ताहात विद्यार्थ्यांनी पौष्टीक अन्न यांचे महत्त्व आणि त्याचे शरीराच्या जडणघडणीत असलेले गरज या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सप्ताहा निमित्ताने विद्यार्थ्यांना दररोज पौष्टीक पदर्थ घरातून बनवून आपल्या सोबत डब्ब्यांमध्ये आणण्याची शाळेकडून करण्यात आलेली सूचना पालक वर्गाने तंतोतंत पाळली. या सप्ताहाचा समारोप प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी घरगुती पदार्थ बनवून आणणे आणि त्याचे प्रदर्शन अशा पध्दतीने ठेवण्यात आला होता.

यावेळी महिला मंडळ संस्थेच्या सचिव मीना प्रभावळकर, स्नेहा गाढे, श्रद्धा मुंडेकर यांनी परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडलेल्या पदार्थात शिजवलेले कडधान्य, आंबवलेले पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे, वेगवेगळ्या प्रकारचे सलाड, पोष्टीक लाडू, पुलाव आणि इनोव्हेटिव्ह गोड पदार्थ मांडण्यात आले होते. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी स्मिता गणवे, प्रेमा पितळे, मेघा पिंगळे, सुषमा सुपे, माधुरी देशमुख, वृषाली माळी, सुप्रिया भासे, शारदा राठोड, प्रियांका पालवे यांचा सहभाग होता.

Exit mobile version