शिमगोत्सवात दोन गटात वाद ; डोंगर गावात जमावबंदीचे आदेश जारी


। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकणात शिमगोत्सवाला मोठ्या आनंदात सुरवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण जवळपास 15 दिवस असतो. या सणाला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात डोंगर येथे शिमगोत्सवात पालखी नेण्यावरून दोन गटात वाद झाला. या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून राजापूर पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल सुमारे 41 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली होती. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उभय गटातील संशयितांना शनिवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तहसीलदार शितल जाधव यांनी गावात जमावबंदी आदेश लागू केले आह
प्रत्यक्ष बैठकीत वाद निर्माण होवून त्यातून हाणामारी होऊन राजापूर पोलिसांनी उभय गटातील सुमारे 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी प्रारंभी दिलेल्या आदेशाचे पालन उभय गटांकडून न झाल्याने वाद निर्माण झाल्याने आता नव्याने बंदी आदेश जारी करत शिमगोत्सव साजरा करण्यावर प्रतिबंध केला तर गावात बंदी आदेश जारी केला आहे.

Exit mobile version