रोह्यातील ग्रुप ग्रामपंचायत आरे बुद्रुकचा उपक्रम
| चणेरा | प्रतिनिधी |
गावांमध्ये, घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा कचरा टाकण्यासाठी डस्टबिनचा वापर व्हावा, डस्टबिनमुळे दूषित आणि कुजलेला कचरा एकाच ठिकाणी साठवता येतो आणि तो आसपासच्या वातावरणापासून दूर नेता येतो. तर, कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी डस्टबिनचा फायदा होतो. या बाबी लक्षात घेऊन 15 व्या वित्त आयोगातून 400 घरगुती कचराकुंडीचे (डस्टबिन) वाटप ग्रुप ग्रामपंचायत आरेबुद्रुक अंतर्गत येणार्या आरेबुद्रुक, आरेखुर्द आणि कुंभोशी या गावांमध्ये करण्यात आले.
यावेळी सरपंच राजेंद्र मळेकर, ग्रामसेविका प्रिया कुंडे, सदस्या अनिता चोंडे, सदस्य चेतन शिंदे, प्रशांत शिंदे, सुहास शिंदे, दगडू शिंदे, संकेत घाग, नरेश चोंदे, पुंडलिक घाग, परशुराम म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.