माउली फाउंडेशनकडून शैक्षणिक साहित्य वाटप

। अलिबाग । वार्ताहर ।

येथील माउली फाउंडेशनच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील थळ चाळमळा या जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. माउली फाउंडेशन गेली तीन वर्षे नियमितपणे येथील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिचे शालेय दप्तर, कंपास, वह्या, रंगपेटी, वह्या आणि इतर आवश्यक साहित्याचे वाटप करीत आहेत. या वितरण सोहळ्याला माउली फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, नितीन  भगत, अनिकेत पाटील, विनीत भगत, अंधन भगत, हर्ष रसाळ, अजिंक्य पाटील, यश वाळंज, अभिजित जैतापकर, मुख्याध्यापक धनंजय म्हात्रे, साक्षी पाटील, प्रियांका शिंदे, अरुण मांडवेकर आदी मान्यवर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version