शैक्षणिक साहित्याचे वाटप

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे लॅपटॉप प्रोजेक्टरची भेट व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

गेल्या दहा वर्षांची यशस्वी परंपरा राखत याही वर्षी साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने स्व.शिवरामकृष्णन आयर यांच्या स्मरणार्थ व डॉ. असिफ कासकर यांच्या विशेष प्रयत्नांतून विद्यालयास लॅपटॉप प्रोजेक्टरची भेट देऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. असिफ कासकर, डॉ. गौतम त्रेहन, अमित चौधरी, संदीप विचारे, कविता पाटील, अश्विनी विचारे, संदेश गमरे, विनोद पाटील, तौसिफ येरूणकर, मुख्याध्यापक दिपक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version