। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुका मनसेतर्फे नवघर येथील गरीब व गरजू शेतकर्यांना खताचे वाटप करण्यात आले. शेतकर्यांना खत वाटपाचा कार्यक्रम जितेंद्र पाटील यांच्या आदेशाने सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली संदीप मालुसरे यांच्या विशेष सहकार्याने शेखर चव्हाण, नितीन सुतार, युवराज सुतार, सूरज सुतार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.






