| सोगाव | वार्ताहर |
पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत मापगावतर्फे ग्रामपंचायत हद्दीतील सोगाव उर्दु, सोगाव मराठी, टाकादेवी, मापगांव, मुशेत व बहिरोळे या सहा अंगणवाड्यांमधील मुलांना शालेय गणवेश वाटप सरपंच उनीता थळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला मापगाव सरपंच ऊनीता थळे, उपसरपंच अनिता शिंदे, माजी सरपंच सुनिल थळे, तंटामुक्ती उपाध्यक्ष निसर्ग राऊत, ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, संजय शिंदे, चंद्रकांत खोत, विवेक जोशी, सचिन घाडी, सूचित थळे, अनिल जाधव, किशोर सातमकर, राजेंद्र घरत, विकास राणे, गितेश करळकर, ग्रामविकास अधिकारी माधुरी भोईर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.