मराठा सेवा संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

। नेरळ । प्रतिनिधी ।

मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांची रायगड जिल्हा कार्यकारिणी कर्जत येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. तालुक्यातील दोन कार्यकर्त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली.

संभाजी ब्रिगेड संघटनेची राज्यात शिवसेनेसोबत युती जाहीर झाल्यानंतर पेण येथे झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये रायगड जिल्हा कार्यकारिणीमधील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात कर्जत येथील मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते ऋषभ लाड यांची रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी, तर कर्जत येथील श्रीकांत आगीवले यांची रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे स्वप्नील म्हात्रे, जिल्हाध्यक्ष परमानंद जांभळे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version